‘अजहर’चे मोशन पोस्टर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 09:21 IST
इमरान हाश्मी सध्या मोहम्मद अजहरूद्दीन याच्या जीवनावर आधारित ‘अजहर’ या बायो
‘अजहर’चे मोशन पोस्टर आऊट
इमरान हाश्मी सध्या मोहम्मद अजहरूद्दीन याच्या जीवनावर आधारित ‘अजहर’ या बायोपिकवर शूटिंग करतो आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर आऊट करण्यात आले आहे. या चित्रपटाविषयी प्रचंड चर्चा सध्या सुरू आहे.या पोस्टरमध्ये इमरानने हातात बॅट पकडली असून निळ्या रंगाचा टी शर्ट त्याने घातला आहे. मोशन पोस्टर मध्ये तो हे सांगतो आहे की, त्याला मॅच फिक्सिंगमध्ये पकडण्यात आले होते. या चित्रपटात प्राची देसाई, गौतम गुलाटी आणि नर्गिस फाखरी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.दिग्दर्शक टोनी डिसुजा यांचा हा चित्रपट मे महिन्यात रिलीज होणार आहे. इमरान सध्या त्याच्या करिअरच्या खुपच वाईट काळातून जात आहे. त्याचे याअगोदरचे चित्रपट मिस्टर एक्स, राजा नटवरलाल आणि उंगली हे बॉक्स आॅफीसवर फार काही रसिकांना आवडले नाहीत. या चित्रपटाने प्रेक्षकवर्ग खेचून आणायला हवा, असे त्याला वाटते आहे.">http://