Join us  

आयुष्मान खुराणाच्या केसांवर फिदा झाला फॅन, अभिनेत्याने दिलेलं उत्तर वाचून पोट धरून हसाल!

By अमित इंगोले | Published: October 21, 2020 11:20 AM

एका फॅन्सने आयुष्यानच्या केसांना स्पर्श करण्याबाबत कमेंट केली. फॅनने कमेंट केली की, तुझा हा चेहरा, तुझ्या अदांमुळे माझ्या फोनला आग लागेल. मला तर या केसांना स्पर्श करायचा आहे.

अभिनेता आयुष्मान खुराणा हे एक वेगळंच रसायन आहे. कधी तो सोशल मीडियावर आपल्या लूक्सने सर्वांना वेड लावतो. आयुष्मान केवळ एक चांगला अभिनेताच नाही तर त्याचे अनेक रूप आहेत. जे पाहून त्याचे फॅन्स नेहमीच अवाक् होतात. तो सोशल मीडियावरही चांगलाच अ‍ॅक्टिव राहतो. अनेकदा तो त्याच्या फॅन्सच्या कमेंट्ना मजेदार रिप्लायही देतो. असाच एक रिप्लाय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

आयुष्मानचा गंमतीदार अंदाज

आयुष्मान खुराणाने नुकताच इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून आयुष्मान स्वत:च इतकाच आनंदी आहे की, स्वत:चंच कौतुक करत आहे. हा फोटो शेअर करत आयुष्मानने लिहिले की, 'मी उठलो आणि मला फारच फ्रेश वाटत होतं. नंतर मी स्वत:ला आरशात पाहिलं. काय केस आहेत?'. हा फोटो त्याच्या फॅन्सनाही चांगलाच आवडला. अनेकांना त्याच्या या लूकचं कौतुक केलं. यातील एका फॅन्सने आयुष्यानच्या केसांना स्पर्श करण्याबाबत कमेंट केली. फॅनने कमेंट केली की, तुझा हा चेहरा, तुझ्या अदांमुळे माझ्या फोनला आग लागेल. मला तर या केसांना स्पर्श करायचा आहे.

आता या वेगळ्या कमेंटवर आयुष्मान रिप्लाय देणार नाही असं तर होऊ शकत नाही. पण त्याचे जो रिप्लाय दिला तो वाचून तुम्ही पोटधरून हसू लागाल. सामान्यपणे फॅन्सच्या कमेंट्सवर कोणताही अभिनेता धन्यवाद असा रिप्लाय करेल. पण आयुष्यान इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याने त्याच्या वेगळ्या अंदाजात या कमेंटवर रिप्लाय दिला. फॅनच्या या कमेंटवर आयुष्मानने लिहिले की, 'मी तुझ्यासाठी माझा विग पाठवून देतो'. आता आयुष्मानचा या गमतीदार उत्तरावर फॅन्स हसू लागले आहेत. कारण कुणीही आयुष्मानकडून अशा गमतीदार रिप्लायची अपेक्षा केली नसेल. 

वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर आयुष्मान, अभिषेक कपूर आणि वाणी कपूरसोबत एका सिनेमावर काम करत आहे. या सिनेमाची कथा वेगळी असल्याचं सांगितलं जात आहे. यात एका अशा पतीची कहाणी आहे ज्याला कळतं की, त्याची पत्नी ट्रान्सजेंडर आहे. या लाइनच्या अवतीभवती या सिनेमाची कथा फिरते.

टॅग्स :आयुषमान खुराणाबॉलिवूडसोशल मीडियासोशल व्हायरल