आयशा टाकियाचा खुलासा; यामुळेच बिकिनी सीनला नकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2017 19:17 IST
बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचा सुपरहिट चित्रपट ‘वॉण्टेड’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री आयशा टाकिया सध्या इंडस्ट्रीमधून गायबच झाली आहे. ...
आयशा टाकियाचा खुलासा; यामुळेच बिकिनी सीनला नकार!
बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचा सुपरहिट चित्रपट ‘वॉण्टेड’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री आयशा टाकिया सध्या इंडस्ट्रीमधून गायबच झाली आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात तिचा बदलेला लुक व्हायरल झाल्याने ती प्रकाशझोतात आली होती. आता पुन्हा एकदा ती बिकिनी स्टेटमेंटमुळे चर्चेत आली आहे. आयशाने ‘मी माझ्या करिअरमध्ये एकाही चित्रपटात बिकिनी का घातली नाही’, याचा खळबळजनक खुलासा केला आहे. वास्तविक आयशा बºयाच काळानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करीत आहे. ती लवकरच तिच्या आगामी ‘बोरिबली का ब्रुस ली’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. याविषयी बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्याशी संबंधित अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. यावेळी तिने बॉलिवूडविषयी अनेक खुलासे केले, ज्यामध्ये तिने बिकिनी खुलासाही केला. ‘जेव्हा एखादी अभिनेत्री बिकिनी सीन्स देण्यास नकार देते, तेव्हा प्रोड्युसर तिला चित्रपटात घेण्याबाबत विचार करीत नाहीत’ असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आयशाने म्हटले की, ‘मी आतापर्यंत २० चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र यात मी कधीही बिकिनी सीन दिला नाही. मी नेहमीच त्या लोकांपैकी एक राहिली आहे, जे फॅशनेबल कपडे परिधान करणे पसंत करतात; मात्र एका लिमिटपर्यंत. मी काही गोष्टींवरून कम्फर्टेबल नाही अन् पुढेही तशीच राहणार आहे. पुढे बोलताना आयशाने म्हटले की, ‘मी याविषयी जाणून होते की एक दिवस माझी मुले मोठे होणार आहेत अन् माझे चित्रपट बघणार आहेत. माझ्या मुलांनी मला अशा अवस्थेत बघावं असे मला वाटत नाही. सध्या मी एका मुलाची आई असून, त्याच्यासमोर मी स्वत:ला लपवू इच्छित नाही. जेव्हा तो माझे चित्रपट बघेल तेव्हा त्याला माझ्यावर गर्व वाटायला हवा’, असेही आयशाने म्हटले. काही दिवसांपूर्वीच आयशाने आपला लुक बदलण्यासाठी सर्जरीचा आधार घेतल्याचे काही फोटोज् व्हायरल झाले होते. यावेळी तिने ओठाचा आकार बदलल्याने तिच्या चाहत्यांमध्ये काहीशी नाराजीही पसरली होती. मात्र आयशाने सर्जरीच्या चर्चा अफवा असल्याचे सांगत व्हायरल झालेले फोटो फेक असल्याचे म्हटले होते. आयशाने मुंबई मिररशी बोलताना म्हटले होते की, मी त्यावेळी गोवा येथे होती. मी जेव्हा माझे व्हायरल होत असलेले फोटोज् बघितले होते तेव्हा मी बुचकळ्यात पडली होती. मला ते खूपच फनी असे वाटले, फोटो बघून माझे हसणे थांबत नव्हते. दरम्यान, आता पुन्हा एकदा ती बिकिनी स्टेटमेंटमुळे चर्चेत आली आहे.