रणबीर-कॅटच्या पॅचअप साठी ‘अयान’ चे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 12:02 IST
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचे ब्रेकअप झाल्याने इतर सेलिब्रिटींनाही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यातील वाद-तणावामुळे त्यांच्या ...
रणबीर-कॅटच्या पॅचअप साठी ‘अयान’ चे प्रयत्न
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचे ब्रेकअप झाल्याने इतर सेलिब्रिटींनाही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यातील वाद-तणावामुळे त्यांच्या मित्रांनाही काय करावे तो प्रश्न पडला आहे.रणबीरचा खास मित्र दिग्दर्शक अयान मुखर्जी हा त्यांच्या दोघांत तणाव संपून प्रेम सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करतोय. तिकडे ‘जग्गा जासूस’ची शूटिंग मधूनच थांबते पुन्हा सुरू होते. अनुराग बासू हा देखील तसाच खुप परेशान आहे.अयानने नुकतीच जग्गा जासूसच्या सेटला भेट दिली आणि रणबीर-कॅटच्या वागण्यामुळे काही तणाव तर नाही ना ? याची खात्री करून घेतली. मात्र, कॅट रणबीरकडे चांगलेच दुर्लक्ष करताना दिसते आहे. वेल, त्या दोघांमधील तणाव कधी संपतो आणि ते पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात असे झाले आहे.