अवॉर्ड विजेत्यांनी मानले ‘लोकमत’चे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार - रंगभूमी (महिला) क्षेत्रातील पुरस्कार सुकन्या कुलकर्णी यांना मिळाला. या पुरस्काराचा आनंद सुकन्या यांच्या चेह-यावर असा स्पष्ट दिसला. जाहिरात क्षेत्रातील मोठे नाव असलेले भरत दाभोळकर यांच्यासह त्यांनी अशी मस्त पोझ दिली.
अवॉर्ड विजेत्यांनी मानले ‘लोकमत’चे आभार
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार - रंगभूमी (महिला) क्षेत्रातील पुरस्कार सुकन्या कुलकर्णी यांना मिळाला. या पुरस्काराचा आनंद सुकन्या यांच्या चेह-यावर असा स्पष्ट दिसला. जाहिरात क्षेत्रातील मोठे नाव असलेले भरत दाभोळकर यांच्यासह त्यांनी अशी मस्त पोझ दिली.भारतीय रंगभूमीवरील एक प्रसिद्ध नाव म्हणजे फिरोझ अब्बास खान. प्रसिद्ध दिग्दर्शक, नाट्य लेखक आणि पटकथाकार फिरोझ अब्बास खान यांना यंदाच्या रंगभूमी विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले. पत्नीसोबत त्यांनी आपला हा आनंद त्यांनी शेअर केला. गायक नंदेश उमक यांनी लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अशी बिनधास्त एन्ट्री केली.