भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी तो कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. कधीकधी त्याच्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेत येतात, तर कधीकधी त्याच्या कारकिर्दीबद्दल नवीन अटकळ समोर येतात. यावेळी चर्चेचा विषय अवनीत कौर(Avneet Kaur)ची प्रतिक्रिया आहे. तीच अवनीत कौर, जिच्या एका फोटोला लाईक केल्याने कोहली वादात सापडला होता.
टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरने विराट कोहलीच्या फोटोला लाईक केल्याच्या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्या घटनेनंतर काही महिन्यांनी हे स्टेटमेंट दिले आहे. सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट खूप व्हायरल झाला होता. त्यामध्ये विराट कोहलीने अवनीत कौरचा फोटो लाईक केल्याचे दिसले. हा फोटो अवनीतच्या फॅन पेजवरून पोस्ट करण्यात आला होता. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या आणि कोहलीची खिल्ली उडवली होती. शेवटी, विराटला स्टेटमेंट द्यावे लागले होते की हे 'अपघाती' होते आणि इंस्टा ग्लिचमुळे घडले. आता, अनेक महिने गप्प राहिल्यानंतर, अवनीत कौरने पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
"फक्त प्रेम मिळत राहावे....''
अलीकडेच एका कार्यक्रमात अवनीत कौरला विराटचं नाव न घेता विचारण्यात आले की, सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट लाईक करणाऱ्या सेलिब्रिटींना ती काय उत्तर देईल? हा अवनीत लाजली आणि म्हणाली की तिला असेच प्रेम मिळत राहिले पाहिजे. ती म्हणाली, "फक्त प्रेम मिळत राहावे. मी आणखी काय सांगू?" दरम्यान या वादानंतर, अवनीत कौरच्या फॉलोअर्समध्ये दहा लाखांनी वाढ झाली, तिला १२ नवीन ब्रँड डील मिळाल्या आणि तिच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये सुमारे ३०% वाढ झाली.