सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी हिने ‘हिरो’ या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला आणि अथियाच्या करिअरची नौका डगमगू लागली. म्हणायला, अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. दुसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका आणखी खोलात बुडाली आणि पापा सुनील शेट्टीला लेकीच्या करिअरची चिंता सतावू लागली. कदाचित याच चिंतेपोटी सुनील शेट्टी अथियाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये ढवळाढवळ करू लागलाय.
सुनील शेट्टीला सतावू लागली लेक अथियाच्या करिअरची चिंता! केला असा कारनामा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 13:51 IST
पापा सुनील शेट्टीला लेकीच्या करिअरची चिंता सतावू लागली. कदाचित याच चिंतेपोटी सुनील शेट्टी अथियाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये ढवळाढवळ करू लागलाय.
सुनील शेट्टीला सतावू लागली लेक अथियाच्या करिअरची चिंता! केला असा कारनामा!!
ठळक मुद्दे‘मोतीचूर चकनाचूर’ हा चित्रपट देब हसन दिग्दर्शित करत आहेत. तर राजेश् व किरण भाटिया या चित्रपटाचे निर्माते आहेत.