Join us
Daily Top 2Weekly Top 5

WHAT? ‘या’ क्रिकेटपटूला डेट करतेय सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 13:36 IST

अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहेत. होय, अथिया एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची सध्या चर्चा आहे.

ठळक मुद्देलवकरच अथिया ‘मोतीचूर चकनाचूर’ या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.

सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी हिने  ‘हिरो’या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. दुसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका बुडताना दिसतेय. पण दुसरीकडे अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहेत. होय, अथिया क्रिकेटपटू केएल राहुलला डेट करत असल्याची सध्या चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी फेब्रुवारीपासून अथिया व केएल राहुल यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले. दोघेही अनेकदा बाहेर फिरायला जातात. एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. कॉमन फ्रेन्ड आकांक्षा रंजन हिने सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत अथिया व केएल राहुल एकत्र दिसत आहे. यावर्षी एप्रिलमध्ये हा फोटो शेअर केला गेला होता.

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार,अथियाने यासंदर्भात बोलण्यास नकार दिला. तर केएल राहुलसोबत यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही. सध्या राहुल वर्ल्ड कपमध्ये  बिझी आहे. त्यामुळे या बातमीत किती तथ्य आहे, हे येणारा काळच सांगेल.

यापूर्वी केएल राहुलचे नाव अभिनेत्री सोनम चौहान आणि निधी अग्रवालसोबतही जोडले गेले होते. पण दोन्ही अभिनेत्रींनी याचा इन्कार केला होता. निधी अग्रवालने तर केएल राहुल माझ्या भावासारखा असल्याचे म्हटले होते. तूर्तास अथियाने या वृत्ताचे खंडन केलेले नाही. त्यामुळे दोघेही याबद्दल काय खुलासा करतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

 लवकरच अथिया ‘मोतीचूर चकनाचूर’ या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. यात ती नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अपोझिट दिसणार आहे. सुनील शेट्टीने लेकीच्या या चित्रपटात नको इतकी ढवळाढवळ चालवली असल्याची बातमी मध्यंतरी आली होती. सुनीलच्या या वागण्याने वैतागलेल्या चित्रपटाच्या निमार्ता-दिग्दर्शकाने यासंदर्भात सुनीलला पब्लिक नोटीस जारी केले होते.

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुल