Join us

स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 11:21 IST

दिलजीतच्या पुण्यातील कॉन्सर्टमध्ये हा प्रकार घडला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय

गायक - अभिनेता दिलजीत दोसांझ हा सर्वांचा लाडका गायक अन् अभिनेता. दिलजीत सध्या जगभरात त्याच्या गाण्यांंचे कार्यक्रम करतोय. दिलजीतच्या कॉन्सर्टला त्याचे तमाम चाहते आणि संगीतप्रेमी माणसं हजेरी लावत असतात. दिलजीतच्या कॉन्सर्टचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. या व्हिडीओत दिलजीतच्या गाण्याचे बोल गात असतानाच एका मुलीच्या डोळ्यातून पाणी आलं. अशातच दिलजीतने नुकतंच पुण्यात कॉन्सर्ट केला. त्यावेळी एका मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडला स्टेजवर प्रपोज केलं.  हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. 

दिलजीतचा पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल

दिलजीतने अलीकडेच पुण्यामध्ये कॉन्सर्ट केला. या व्हिडीओत पाहायला मिळतं की, काळे कपडे परिधान केलेला एक मुलगा स्टेजवर येतो. त्याच्या हातात अंगठी असते. पुढे तो गुडघ्यावर बसून त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करतो. मुलगीही त्याच्या प्रपोजला होकार देऊन त्याच्या अंगठीचा स्वीकार करते. त्यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारतात.  यादरम्यान दिलजीत दोघांसाठी बॅकग्राऊंडला खास गाणं गाताना दिसतो. 

दिलजीतची प्रतिक्रिया काय होती?

मुलाने गर्लफ्रेंडला प्रपोज केल्यावर उपस्थित सर्व प्रेक्षक त्यांच्यासाठी टाळी वाजवतात. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून सर्वांनी या व्हिडीओला पसंती दिलीय. लोक व्हिडीओखाली भरभरून कमेंट्स करत या प्रेमी युगुलाला शुभेच्छा देत आहेत. दिलजीत दोसांझनेही या प्रसंगादरम्यान या दोघांना प्रोत्साहन केलं आणि सपोर्ट केल्याने दिलजीतचे चाहते त्याचंही कौतुक करत आहेत. दरम्यान दिलजीत 'दिल-लुमिनाटी' टूरसाठी जगभरात त्याच्या गाण्यांचे कार्यक्रम करत आहे. दिलजीत याच कॉन्सर्टदरम्यान पुण्यात आला असता हा क्यूट प्रसंग घडला.

 

टॅग्स :दिलजीत दोसांझपुणे