Join us

​बॉलिवूड गाण्याच्या प्रमोशनला पाकी गायक आतिफ असलमचा नकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 11:51 IST

सुधीर मिश्रा दिग्दर्शित ‘दास देव’ हा आगामी चित्रपट अडचणीत सापडला आहे. होय, या चित्रपटाचे प्रमोशन तिस-यांदा रद्द करण्यात आले आहे.

सुधीर मिश्रा दिग्दर्शित ‘दास देव’ हा आगामी चित्रपट अडचणीत सापडला आहे. होय, या चित्रपटाचे प्रमोशन तिस-यांदा रद्द करण्यात आले आहे. या चित्रपटाचे निर्माता संजीव कुमार यांचे मानाल तर, पाकिस्तानी गायक आतिफ असलम याने चित्रपटातील ‘सहमी है धडकन’ या गाण्याचे प्रमोशन करण्यास नकार दिला आहे. ‘दास देव’चे हे गाणे गत २२ फेबु्रवारीला रिलीज झाले होते. आतिफ असलमने हे गाणे सोशल मीडियावर प्रमोट करावे, असा ‘दास देव’च्या निर्मात्यांचा आग्रह होता. आतिफनेही हा आग्रह मान्य केला होता. पण यानंतर त्याने काहीच केले नाही. निर्माता संजीव कपूर यामुळे नाराज आहेत. आतिफने असे का करावे, हे त्यांनाही कळेनासे झाले आहे. आतिफने मला या गाण्याचे प्रमोशन करेल, असा शब्द दिला होता. पण त्याने असे काहीच केले नाही. एक निर्माता या नात्याने त्याने मला शब्द दिला होता. अर्थात त्याने हा शब्द पाळला नाही. आतिफने लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्याचे प्रमोशन आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याने प्रमोशन केले असते तर काय झाले असते, जरा विचार करा, असे संजीव कपूर म्हणाले.अद्याप संजीव यांच्या या नाराजीवर आतिफने काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पण ‘दास देव’चे गाणे प्रमोट न करण्याच्या आतिफच्या निर्णयामागे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक व केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रीयो असल्याचे मानले जात आहे. बाबुल सुप्रीयो यांनी अलीकडे पाकिस्तानी कलाकारांवर बॉलिवूडमध्ये बंदी लादावी, या मागणीचा पुनरूच्चार केला होता. सुप्रीयो यांनी ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ या अलीकडे रिलीज झालेल्या चित्रपटात पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांनी गायलेल्या गाण्याचाही विरोध केला होता. सोबतच ‘टायगर जिंदा है’मधील आतिफ असलमने गायलेल्या गाण्यालाही विरोध दर्शवला होता.‘दास देव’ या चित्रपटात अभिनेता राहुल भट्ट देवदासच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात राहुल भट्ट साकारत असलेला हा देवदास थोडा वेगळा असणार आहे. कारण चित्रपटाची पार्श्वभूमी राजकीय असणार आहे. ‘दास देव’मध्ये अभिनेत्री रिचा चड्ढा पारोची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अदिती राव हैदरी चंद्रमुखीची भूमिका साकारणार आहे.