‘सरबजीत’ मधील ऐशचा फर्स्ट लुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 10:50 IST
ऐश्वर्या रॉय बच्चनचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’ मधील फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला आहे. सेटवर तिने तिच्या साध्या लुकनेही सर्वांना ...
‘सरबजीत’ मधील ऐशचा फर्स्ट लुक
ऐश्वर्या रॉय बच्चनचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’ मधील फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला आहे. सेटवर तिने तिच्या साध्या लुकनेही सर्वांना मोहित केले आहे. निर्मात्यांनी सरबजीत मधील ऐशचा न्यू लूक रिव्हील केला आहे.ती लाल बांगड्या, लाल चुडीदार, ओठांना लाल रंगाची लिपस्टीक अशा एकदम स्टनिंग लुकमध्ये दिसत आहे. ती या फोटोत स्वत:ला काजळ लावत आहे. निर्माता संदीप सिंग याने हा फोटो टिवटरवर पोस्ट केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ हिअर इज द ब्रेव्हहार्ट दलबीर कौर.लव्ह एव्हरी बिट आॅफ धिस पिक्चर अॅट ऐश्वर्या रॉय बच्चन फ्र ॉम सरबजीत.’ ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात रणदीप हुडा आणि रिचा चढ्ढा हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. }}}}