Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आशा भोसले यांचे ‘स्टेज शो’ला अलविदा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 16:35 IST

गेल्या सहा दशकांपासून रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले या यापुढे स्टेज शो करणार नाहीत. यापुढे ...

गेल्या सहा दशकांपासून रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले या यापुढे स्टेज शो करणार नाहीत. यापुढे स्टेज शो न करण्याचा निर्णय आशा भोसले यांनी घेतला आहे. अगदी अलीकडे वॉशिंग्टन येथे आशा दीदींचा स्टेज शो पार पडला. आता हा स्टेज शो आशा दींच्या आयुष्यातील अखेरचा स्टेज शो ठरणार आहे. वॉशिंग्टन येथील स्टेज शो हा आपल्या आयुष्यातला शेवटचा स्टेज शो असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  मी आता ८३ वर्षांची झाली आहे. त्यामुळे यापुढे मी स्टेज शो करणार नाही. अमेरिका तर सोडाच पण यापुढे मी कुठेच स्टेज शो करणार नाही, असे रेडिफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत आशा भोसले म्हणाल्या . आशा भोसले यांनी आॅस्ट्रेलिया, न्यूजीलँड, दुबई, अमेरिका आणि लंडनमध्ये शो केले आहेत. यापुढे मात्र देश-विदेशातील रसिक श्रोत्यांना आशा दीदींना लाईव्ह ऐकता येणार नाही.. वयाच्या ८३ व्या वषीर्ही आशाजींच्या आवाजाची जादू तशीच कायम आहे यामागचे रहस्यही आशा दींनी सांगितले. त्या म्हणाल्या, माझा आवाज सुरेल राहण्यासाठी मी रोज सकाळी शास्त्रीय संगिताचा अभ्यास करते. सकाळी मी  ओम..ओम चे उच्चारण करते हा एक प्रकारचा योगाभ्यास आहे आणि त्यानंतर मी काही किलोमीटर फिरायला जाते.