Join us

आॅस्ट्रियात ऐश-रणबीरचा रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 10:07 IST

वेट...वेट....काही निष्कर्ष काढू नका..शीर्षक वाचून तुमच्या डोक्यात काही वेगळेच आले असणार हे माहिती आहे. तुम्ही वाचता आहात ते खरे ...

वेट...वेट....काही निष्कर्ष काढू नका..शीर्षक वाचून तुमच्या डोक्यात काही वेगळेच आले असणार हे माहिती आहे. तुम्ही वाचता आहात ते खरे आहे पण चित्रपटासाठी. ऐश्वर्या रॉय बच्चन आणि रणबीर कपूर हे सध्या करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत.या सेटवरील काही फोटो लीक झाले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्या रॉय चॉकलेट बॉय रणबीर कपूरसोबत अत्यंत रोमँटिक मुडमध्ये दिसत आहे. वेल, यात काही शंका नसणार की, त्यांची जोडी कशी दिसतेय? अतिशय हॅपनिंग आणि हॉट ते एकमेकांसोबत दिसत आहेत.ते प्रथमच एकमेकांसोबत काम करत आहेत. हा चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होणार असून अनुष्का शर्मा आणि फवाद खान हे मुख्य भूमिकेत असतील.