‘ऐ दिल...’मध्ये कलाकारांची जंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 07:52 IST
तीन वर्षांच्या काळानंतर करण जोहर ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाद्वारे तो पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.चकाचक ...
‘ऐ दिल...’मध्ये कलाकारांची जंत्री
तीन वर्षांच्या काळानंतर करण जोहर ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाद्वारे तो पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.चकाचक लोकेशन्स, सुंदर गाणी, आणि लार्जर दॅन लाईफ रोमॅन्स अशी काही त्याच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये सांगता येतील.याबरोबरच त्याच्या चित्रपटामध्ये अनेक पाहुण्या कलाकरांचे दर्शनही आवर्जून होते. त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये इंडस्ट्रीतील हीरो-हीरोईन्स ‘गेस्ट अपिरियन्स’ किंवा ‘फ्रेंडली केमिओ’ म्हणून काम करतात.मग ‘ऐ दिल...’ मध्ये कोणकोण पाहायला मिळणार?रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या प्रमुख भूमिकांबरोबरच काजोल, फवाद खान, इम्रान अब्बास आणि सैफ अली खान आदी कलाकार पाहुणे म्हणून चित्रपटात दिसणार आहेत. काजोल तर करणची ‘लकी चार्म’ आहे. या चित्रपटात तिची छोटी पण अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.या वर्षी २८ आॅक्टोबरला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पाहुणे मंडळींचा किती फायदा होते ते कळेलच.