आर्टिस्टने रेखाटली शाहरूखची जर्नी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 08:56 IST
सध्या शाहरूख खान ‘फॅन’ चित्रपटामुळे भलताच चर्चेत आहे
आर्टिस्टने रेखाटली शाहरूखची जर्नी !
सध्या शाहरूख खान ‘फॅन’ चित्रपटामुळे भलताच चर्चेत आहे. हा चित्रपट त्याच्या एका फॅनवर आधारित असल्याने जगातील त्याचे विविध चाहते त्याच्यापर्यंत आपली कला आणि प्रेम पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.नुकत्याच एका राहूल आर्या नावाच्या सँड आर्टिस्टने मातीच्या साह्याने शाहरूखच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचा संपूर्ण लेखाजोखा व्हिडिओच्या माध्यमातून सादर केला. यामाध्यमातून त्याने शाहरूखला एक गिफ्टच दिले आहे. शाहरूखच्या जन्मापासून ते शिक्षण बॉलीवूड एन्ट्री, चित्रपट हे सर्व त्याने या व्हिडिओत साकारले आहे.यु ट्यूबवर हा व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा व्हिडिओ ‘रईस’च्या नावाने संपतो. अत्यंत कठीण पण सुंदरपणे हे आर्ट साकारण्यात आले आहे. हॅट्स आॅफ टू हीम!">http://