Join us

अर्शद वारसीच्या १५० जुन्या बंगल्यात मुक्काम करण्याची संधी, एका दिवसाचे भाडे किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 18:27 IST

अर्शद वारसीनं शेअर केला घराचा व्हिडीओ, एक रात्र काढण्यासाठी मोजावे लागतील 'इतके' पैसे

Arshad Warsi Goa Portuguese Villa: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी याने सोशल मीडियावर त्याच्या गोव्यातील सुंदर आणि ऐतिहासिक घराची झलक शेअर केली आहे. विशेष म्हणजे, हे १५० वर्ष जुने पोर्तुगीज शैलीतील घर आता भाडेतत्वावर मिळतंय. हे घर तुम्हीही भाड्याने घेऊ शकता, पण त्यासाठी खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

अर्शद वारसीचं 'कासा झेन' नावाचं हे घर नॉर्थ गोवामध्ये आहे.  जो त्यांच्या सर्वात खास मालमत्तांपैकी एक आहे. हा बंगला खूपच सुंदर आणि डोळ्यांना सुखावणारा आहे. त्याची स्वतःची एक वेगळी शैली आहे.  या बंगल्यात नवीन आणि जुन्या गोष्टींचे सुंदर सजावट आहे. अर्शद वारसीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत या घराची झलक दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, "मला माझ्याच घराचं वेड लागलं आहे. रोज इथे आराम करण्यासाठी नवीन जागा सापडते".

अर्शदच्या बंगल्याचे भाडे किती?

अर्शदच्या या बंगल्यात ५ बेडरूम्स, कलरफुल इंटीरियर, इनडोअर प्लांट्स, प्रीमियम फर्निचर, सुंदर गार्डन आणि खासगी स्विमिंग पूलदेखील आहे.  या प्रॉपर्टीचं व्यवस्थापन "Wildflower Villas" टीमकडे आहे. त्यांच्या माहितीनुसार, एका रात्र या घरात राहण्यासाठी ७५ हजार लागतील.

अर्शदच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या  १९ सप्टेंबर २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. यासोबतच तो 'Welcome to the Jungle' या बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर सिनेमातदेखील पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :अर्शद वारसीगोवासुंदर गृहनियोजन