Join us
Daily Top 2Weekly Top 5

​चित्रपट महोत्सवातून खूप शिकायला मिळते- अर्जुन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 16:11 IST

‘नवीन फिल्ममेकर्सना चित्रपटांविषयी जाणून घेण्यासाठी ‘फिल्म फेस्टिव्हल’सारखे दुसरे व्यासपीठ नाही. नव्या उमेदीच्या कलाकारांना नव्या पद्धतीचा सिनेमा जर विकसित करायचा ...

‘नवीन फिल्ममेकर्सना चित्रपटांविषयी जाणून घेण्यासाठी ‘फिल्म फेस्टिव्हल’सारखे दुसरे व्यासपीठ नाही. नव्या उमेदीच्या कलाकारांना नव्या पद्धतीचा सिनेमा जर विकसित करायचा असेल तर त्यांना चित्रपट महोत्सवातून खूप काही शिकायला मिळते, असे अर्जुन कपूरला वाटते. एका फेस्टिव्हलच्या उद्घाटन प्रसंगी तो बोलत होता.‘नेहमीच्या पठडीतील सिनेमांपेक्षा वेगळा सिनेमा पाहण्यासाठी महोत्सव खूप गरजेचे असतात. एक अभिनेता म्हणून मला तर अशा कार्यक्रमांचे खूप आकर्षण वाटते. इंडस्ट्रीमध्ये येण्या आधी मी अनेक महोत्सवांत जाऊन चित्रपट पाहायचो. यामुळे आपल्याला सिनेमातील बारकावे कळतात.''दिग्दर्शक आणि चित्रपट अभ्यासकांकडून सिनेमा कसा बघावा हे कळते. तरुण फिल्ममेकर्सने तर अशा फेस्टिव्हल्सना आवर्जुन भेट द्यायला हवी. नव्या संकल्पना विकसित करायला हव्यात.’अर्जुन सध्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये श्रद्धा कपूर त्याची को-स्टार आहे.