Join us
Daily Top 2Weekly Top 5

SHOCKING! लहानपणी माझ्यावर बलात्कार झाला होता...; ‘अर्जुन रेड्डी’च्या अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 15:48 IST

हो, हे खूप त्रासदायक आणि अत्यंत क्रूर आहे....

ठळक मुद्देअ‍ॅक्टिंगच्या दुनियेत येण्याआधी काही वर्षे राहुलने पत्रकार म्हणून काम केले आहे.

साऊथच्या ‘अर्जुन रेड्डी’ हा सुपरडुपर हिट चित्रपट पाहिला असेल तर एक हा अभिनेता राहुल रामकृष्णाचा चेहरा अगदी सहज तुमच्या डोळ्यांपुढे येईल.   विजय देवराकोंडाच्या अभिनयाने सजलेल्या ‘अर्जुन रेड्डी’ या सिनेमात तेलगू अभिनेता राहुल रामकृष्णने विजयच्या जिवलग मित्राची भूमिका साकारली होती. या भूमिकेने राहुलला नवी ओळख दिली. तो एका रात्रीत प्रकाशझोतात आला. आता याच राहुलने एक धक्कादायक खुलासा केला आहे. होय, लहानपणी आपल्यावर बलात्कार झाल्याचे त्याने सांगितले आहे. 

 ‘हे प्रचंड त्रासदायक आहे. लहानपणी माझ्यावर बलात्कार झाला होता.  याबद्दल मी आणखी काय सांगू, हे मला माहित नाही. पण या घटनेनंतर मला स्वत:ला जाणून घ्यायचे आहे,’ असे ट्वीट राहुलने केले आहे. या ट्वीटपाठोपाठ त्याने आणखी एक ट्वीट केले. ‘ माझ्या आयुष्यातील ही घटना ‘ब्लॅक होल’ सारखी असल्याचे मी मानतो. मी याला अधिक महत्त्व देऊ इच्छित नाही,’ असे त्याने लिहिले.

 

पुढे तो लिहितो, ‘हो, हे खूप त्रासदायक आणि अत्यंत क्रूर आहे. केवळ माझ्याबद्दल नाही तर इतरांनाही हे लागू आहे. अशा घटना तुम्हाला पीडित बनवतात. पण सोबत तुम्हाला लढायलाही शिकवतात. माझ्यावर लादलेल्या गुन्ह्यासोबत मी जगत आहे. मला आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. पण तुमच्या आपल्या लोकांसाठी बोला. बोलते व्हा.’

राहुलच्या या एकापाठोपाठ एक केलेल्या पोस्टमुळे सध्या साऊथ इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल की, अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत येण्याआधी काही वर्षे राहुलने पत्रकार म्हणून काम केले आहे. अल्लू अर्जूनच्या  अला व्यंकटपुरम लो, ची ला साओ, भारत अने नेनू, शीशमहल, गीता गोविंदम, मिठाई आदी सिनेमात त्याने काम केले आहे.

 

टॅग्स :विजय देवरकोंडा