Join us

अर्जुन-करिनाचा ‘हाफ मॅरेथॉन’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 22:38 IST

 अर्जुन क पूर आणि करिना कपूर खान हे दोघेही सध्या एकाच गोष्टीमुळे चर्चेत आहेत. ते म्हणजे त्यांचा आगामी चित्रपट ...

 अर्जुन क पूर आणि करिना कपूर खान हे दोघेही सध्या एकाच गोष्टीमुळे चर्चेत आहेत. ते म्हणजे त्यांचा आगामी चित्रपट ‘की अ‍ॅण्ड का’ साठी. करिअर ओरिएंटेड करिना यात घर सांभाळणारा पती अर्जुन कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.सध्या ते दोघे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये फार बिझी आहेत. त्या दोघांना संडे मॉर्निंगचे स्वागत कसे करावे ते कळतच नव्हते म्हणून त्यांनी मुंबईत सुरू असलेल्या ‘हाफ मॅरेथॉन’ मध्ये सहभाग घेतला. त्यांनी ‘की अ‍ॅण्ड का’ चे काळ्या रंगाचे ड्रेस घातले होते. आणि एकमेकांसोबत ते अत्यंत हॉट दिसत होते. यापेक्षा वेगळे अजून संडे मॉर्निंगला काय करता येऊ शकते.चित्रपट रिलीज होण्यास अवघे २ आठवडे बाकी असताना ते दोघे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वाट्टेल ते करायला तयार आहेत. आर. बल्की दिग्दर्शित चित्रपट ‘की अ‍ॅण्ड का’ १ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचे संगीत युट्यूबवर अगोदरच हिट आहे. प्रोमोजलाही अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट आता केव्हा रिलीज होतो असे झाले आहे. }}}}