दुसरीकडे अभिनेता अनिल कपूर, रेखा, नीलिमा आजमी, वैभवी मर्चेंट यांनीदेखील श्रीदेवीचे घर गाठले. सध्या बरेचसे अभिनेते चित्रपटांच्या शूटिंगसाठी विदेशात आहेत. मात्र या बातमीमुळे सर्वच मुंबईत परतत आहे. दरम्यान श्रीदेवी यांचे पार्थिव रात्री उशिरापर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
दुबईत पार्थिव मिळविण्यासाठी कायदेशीर नियमांचे पुर्तता करणे गरजेचे असल्याने पार्थिव भारतात आणण्यासाठी विलंब होत आहे. दरम्यान आतापर्यंत नियमांची सर्व पूर्तता झाली असून, रात्री आठ वाजेपर्यंत पार्थिव मुंबईत येण्याची शक्यता आहे.