Join us

​अर्जून कपूरने केली विराटची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 19:14 IST

अनुष्का शर्माची खिल्ली उडवणाºयांना तिचा कथित बॉयफ्रेन्ड विराट कोहली याने काल चांगलेच फैलावर घेतले. अनुष्काची अशी खिल्ली उडवणाºयांना लाज ...

अनुष्का शर्माची खिल्ली उडवणाºयांना तिचा कथित बॉयफ्रेन्ड विराट कोहली याने काल चांगलेच फैलावर घेतले. अनुष्काची अशी खिल्ली उडवणाºयांना लाज वाटायला हवी, इथपर्यंत विराट बोलून गेला. विराटचा हा आक्रमक पवित्रा अर्जून कपूर याला चांगलाच भावला. इतका की, टिष्ट्वटरवर टिष्ट्वट करत अर्जूनने विराटची पाठराखण केली. अनुष्काची खिल्ली उडवणाºयांना विराटने दिलेला ‘दणका’ अगदी योग्य आहे. विराटचे हे पाऊल अगदी योग्य आहे, अशा थाटात अर्जूनने विराटची बाजू उचलून धरली.   

U gotta respect @imVkohli as a person for his post today... @AnushkaSharma is the most decent and correct person and she deserves respect !!— Arjun Kapoor (@arjunk26) March 28, 2016विराटच्या नकारार्थी गोष्टींचा संबंध अनुष्काशी जोडून त्यावर विनोद केले गेल्याने काल विराट चांगलाच संतापला होता. माझ्यासंदर्भातील नकारार्थी गोष्टींचा संबंध अनुष्काशी जोडणाºयांना लाज वाटायला हवी. क्रिकेटमधील माझ्या कामगिरीवर अनुष्काचे कुठलेही नियंत्रण नाही. त्यानंतरही तिच्यावर अकारण टीका करणाºयांना, तिची खिल्ली उडवणाºयांना लाज वाटायला हवी. तुमची स्व:ताची प्रेयसी, बहीण वा पत्नीची कुणी अशीच खिल्ली उडवली तर तुम्हाला कसे वाटेल? अनुष्काने मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. तिने मला नेहमीच प्रेरणा दिली आहे, अशा शब्दांत विराटने आपला रोष व्यक्त केला होता. अनुष्कासोबतच्या ब्रेकअपनंतर विराटची कामगिरी सुधारली आहे. यापार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून विराट व अनुष्का यांचे नाते थट्टेचा विषय बनले होते.