Join us

स्वीमिंग पूलमध्ये मलायकाला पाहून स्वत:ला रोखू शकला नाही अर्जुन कपूर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 13:08 IST

मलायका व अर्जुन पुन्हा एकमेकांसोबत आहेत. कुठे तर दूर गोव्यात.  

ठळक मुद्देमलायका अरोरा आणि अर्जुन कपूर भलेही आपल्या रिलेशनशिपबाबत काही बोलत नसतील. पण त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट सारे काही सांगतात.

मलायका अरोराने नुकताच एक खुलासा केला होता. मी अर्जुन कपूरसोबत क्वारंटाइनमध्ये होते, असे तिने सांगितले होते. तिने अर्जुनचे थेट नाव घेतले नाही, पण मलायकाच्या कोणासोबत क्वारंटाइनमध्ये राहू शकते, हे आपल्याला माहित आहेच. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे आयुष्य कंटाळवाणे झाले. पण अनेकांसाठी ते एंटरटेनिंग होते. कारण यादरम्यान अनेकांना आपल्या पार्टनरसोबत क्वारंटाइनमध्ये राहण्याची संधी मिळाली. याकाळात एकमेकांना अधिक समजून घेण्याची, एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. मी एका मजेदार व्यक्तिसोबत क्वारंटाइनचा वेळ घालवला, असे मलायका म्हणाली. आता मलायका व अर्जुन पुन्हा एकमेकांसोबत आहेत. कुठे तर दूर गोव्यात.  होय, हे कपल सध्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेतेय. यादरम्यानचा दोघांच्या एका फोटोने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय. या फोटोत मलायका स्वीमिंग पूलमध्ये उतरत आहे आणि अर्जुन कपूर तिचे फोटो घेतेय. यात मलायका ग्रीन मोनोकिनीत आहे आणि वरून तिने आॅरेंज श्रग घातला आहे.

मलायका व अर्जुन दोघांनीही या ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. या ट्रिपमध्ये मलायका व अर्जुन अर्थात एकटे नाहीत. अमृताची अख्खी फॅमिली त्यांच्यासोबत आहे. मलायकाने अमृतासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर भलेही आपल्या रिलेशनशिपबाबत काही बोलत नसतील. पण त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट सारे काही सांगतात. थँक्सगिविंग 2020 च्या निमित्ताने मलायकाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात तिच्या आयुष्यातील खास लोक होते. या व्हिडीओत अर्जुन कपूरही अनेक ठिकाणी दिसला.

यानंतर मलायकाने अर्जुन कपूरसोबतचा एक खास फोटो शेअर केला  होता. या रोमॅन्टिक फोटोचीही चांगलीच चर्चा झाली होती. जेव्हा तू सोबत असतो तेव्हा क्षणाचीही निराशा नसते, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते.

गुलाबी थंडीत प्रेम फुलतंय! मलायकाने शेअर केला खास फोटो; अर्जुनच्या मिठीत सामावून, म्हणाली...

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर