Join us

बहीण जान्हवी कपूरच्या कपड्यांवर भाष्य केल्याने अर्जुन कपूरचा झाला संताप; अपशब्दांचा वापर करीत काढली भडास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 19:24 IST

अभिनेता अर्जुन कपूर चित्रपटांमध्ये जेवढा हसतमुख बघायला मिळतो, तेवढा रिअल लाइफमध्ये तो गंभीर असल्याचे दिसून येते. बºयाचदा त्याने अनेक ...

अभिनेता अर्जुन कपूर चित्रपटांमध्ये जेवढा हसतमुख बघायला मिळतो, तेवढा रिअल लाइफमध्ये तो गंभीर असल्याचे दिसून येते. बºयाचदा त्याने अनेक सामाजिक मुद्द्यांवर अतिशय आक्रमकपणे आपले म्हणणे मांडले. आता पुन्हा एकदा त्याच्यातील आक्रमकपणा पुढे आला आहे. होय, अर्जुनने ट्विटरवर आपला राग व्यक्त करताना चक्क अपशब्दांचा वापर केला आहे. वास्तविक तो एका वेबपोर्टलवर चुकीच्या पद्धतीने बातम्या दिल्यावरून संतापला. यावेळी त्याने रागाच्या भरात खूपच अपशब्दांचा वापर केला. अर्जुन ट्विट समोर येताच संबंधित वेब पोर्टलने त्याच्याशी संबंधित सर्वच बातम्या डिलीट केल्या. अर्जुनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘तुम्हाला माहिती आहे काय... एका वेबसाइटने अटेंशन मिळविण्यासाठी अतिशय गलिच्छ कृत्य केले...’ अर्जुनने पुढे लिहिले की, हे खूपच लाजिरवाणे आहे. तुमची नजर अशा गोष्टीकडे वळते यासाठी तुम्हाला लाज वाटायला हवी. आपल्या देशात महिलांना कशा पद्धतीने बघितले जाते याचेच हे आणखी एक उदाहरण आहे. यासाठी तुम्हाला लाज वाटायला हवी.’ ज्या त्वेषाने अर्जुनने ट्विट केले त्यावरून कुठल्यातरी महिलेबद्दल पोर्टलवर चुकीच्या पद्धतीने बातमी प्रसिद्ध केली गेली असावी.   पण ही महिला दुसरी-तिसरी कोणीही नसून, अर्जुनची सावत्र बहीण जान्हवी कपूर आहे. होय, या पोर्टलवर जान्हवीच्या कपड्यांवरून बातमी प्रसिद्ध केली होती. ही बातमी बघूनच अर्जुनचा संताप झाला. वास्तविक जान्हवी नेहमीच जीममध्ये जाताना किंवा शूटिंगवरून परताना स्पॉट होत असते. अशात तिचे नवनवीन फोटो समोर येत असतात. नुकतीच ती स्पॉट झाली असता, तिने परिधान केलेल्या ड्रेसवरून या पोर्टलवर बातमी प्रसिद्ध केली गेली होती. अर्जुनच्या या ट्विटवर दोन पद्धतींच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एक म्हणजे अर्जुनच्या कपूरला एआयबी रोस्ट याच्याशी जोडून कॉमेण्ट केले जात आहेत, दुसºया बाजूने अर्जुनच्या सपोर्टसाठी प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, सध्या अर्जुन त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन त्याच्या दोन्ही सावत्र बहिणींचा सांभाळ करीत आहे. त्याचबरोबर वडील बोनी कपूरलाही तो आधार देताना दिसत आहे.