अर्जुन-इलियानाचं एकच प्रेम - पंजाबी खाद्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 18:58 IST
‘पंजाबी खाद्यपदार्थांची लज्जतच काही और असते,’ असे आम्ही नाही तर स्वत: अर्जुन कपूर आणि इलियाना डिक्रुझ म्हणत आहेत. ते ...
अर्जुन-इलियानाचं एकच प्रेम - पंजाबी खाद्य!
‘पंजाबी खाद्यपदार्थांची लज्जतच काही और असते,’ असे आम्ही नाही तर स्वत: अर्जुन कपूर आणि इलियाना डिक्रुझ म्हणत आहेत. ते अनीस बाझमींच्या ‘मुबारकाँ’ चित्रपटासाठी शूटिंग करत असून सेटवर पंजाबी जेवण करण्यासाठी दोघंही अक्षरश: भांडत असतात. एवढं तुफान प्रेम ते पंजाबी जेवणावर करतात! इतरवेळेला ते एकमेकांना एक कलाकार म्हणून समजून घेतात. मात्र, जेव्हा वेळ जेवणाची येते तेव्हा त्या दोघांचाही स्वत:वर कंट्रोल राहत नाही, असे सुत्रांकडून कळतेय. अर्जुन कपूर आणि त्याचा काका अनिल कपूर हे प्रथमच ‘मुबारकाँ’ चित्रपटातून स्क्रिन शेअर करत आहेत. चित्रपटात अर्जुन दुहेरी भूमिका साकारतांना दिसणार आहे. इलियानासोबत त्याने चंदीगढ येथे चित्रपटाचे शूटिंग केले आहे. इलियानाच्या अभिनयाबद्दल बोलताना तो म्हणाला,‘ मी जेव्हा ‘बर्फी’ पाहिला तेव्हा तिच्या अभिनयाने खुप प्रभावित झालो. तेव्हापासून माझी तिच्यासोबत काम करण्याची इच्छा बळावली. ‘मुबारकाँ’ च्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो, याचा मला आनंद आहे. याअगोदरही तिच्यासोबत काम केलेय अशी बाँण्डिंग आमची झाली होती. तिला तिच्या हिंदीबद्दल नेहमीच काळजी वाटायची. पण, कॅमेऱ्यासमोर गेल्यावर तिने तिच्या हिंदीसोबतच स्वत:लाही बदलून टाकले.’दाक्षिणात्य अभिनेत्री इलियाना डिक्रुझ आणि अथिया शेट्टी या दोन अभिनेत्री ‘मुबारकाँ’ मध्ये अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात त्याची दुहेरी भूमिका असल्याने कोणासोबत त्याची केमिस्ट्री जास्त चांगली दिसते हे आता वेळच सांगू शकेल.