Join us
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणून अरिजीत सिंग त्याची गाणी कधीच ऐकत नाही, बर्थ डे निमित्त जाणून घ्या त्याच्या माहित नसलेल्या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 08:00 IST

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्याला चित्रपटात गाण्याची संधी दिली.

सुरेल आवाजाचा बादशाह म्हणून बॉलिवूड गायक अरिजित सिंगकडे पाहिले जातं.अरिजीत सिंगच्या करियरला केवळ 14-15 वर्षं झाली असली तरी त्याची हिट गाण्यांची यादी खूप मोठी आहे. 2005 मध्ये त्याने त्याच्या करियरला सुरुवात केली. खूपच कमी वेळात त्याने बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. अरिजीत आज आपला 34वा वाढदिवस साजरा करतो आहे.  फिर ले आया दिल, तुम ही हो, मस्त मगन, मनवा लागे, छन्ना मेरेया यांसारखी अनेक हिट गाणी त्याने बॉलिवूडला दिलीत. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’मधील तुम ही हो, चाहू मैं या ना या गाण्यांमुळे तर त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

अरिजीत सिंहने फेम गुरूकुल या कार्यक्रमाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या रिअ‍ॅलिटी शो चे विजेतेपद त्याला मिळवता आले नाही. पण या रिअ‍ॅलिटी शो नंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्याला चित्रपटात गाण्याची संधी दिली. सावरियाँ या चित्रपटातील एक गाणे त्याने गायले होते. पण काही कारणास्तव हे प्रदर्शित झाले नाही. पण यानंतर त्याला कामे मिळत गेली. आज अरिजीतने एक गायक, संगीतकार म्हणून आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याने हिंदीप्रमाणे अनेक प्रादेशिक भाषेत देखील गाणी गायली आहेत.

अरिजीत सिंहच्या गाण्याचे आज अनेक दिवाने असले तरी तो स्वतःची गाणी कधीच ऐकत नाही. त्यानेच स्वतः ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. तू तुझी गाणी ऐकतोस का असे त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते. त्यावर माझी गाणी ऐकून मला भीती वाटते. त्यामुळे मी ती ऐकत नाही. एवढेच नव्हे तर माझी पत्नी देखील माझी गाणी ऐकत नाही असे त्याने सांगितले होते. 

टॅग्स :अरिजीत सिंह