Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरिजितला बॉलिवूडमध्ये का वाटतेय असुरक्षित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 13:40 IST

‘ऐ दिल हैं मुश्किल’,‘तुम ही हो’,‘कबीरा’ यासारखी हिट गाणी गायक अरिजित सिंगने बॉलिवूडला दिली. त्याने बॉलिवूडमधील सध्याच्या प्रमुख अभिनेत्यांना ...

‘ऐ दिल हैं मुश्किल’,‘तुम ही हो’,‘कबीरा’ यासारखी हिट गाणी गायक अरिजित सिंगने बॉलिवूडला दिली. त्याने बॉलिवूडमधील सध्याच्या प्रमुख अभिनेत्यांना त्याचा आवाज दिला आहे. त्याचीच गाणी युथमध्येही प्रसिद्ध आहेत. असे असतानाही त्याला बॉलिवूडमध्ये असुरक्षित वाटतेय म्हणे.. त्याला असुरक्षित वाटण्यासारखं झालं तरी काय असं तुम्हाला वाटत असेल...पण, होय हे अगदी खरंय. अरिजित सिंग त्याच्या असुरक्षिततेबद्दल तो म्हणाला,‘ मी बॉलिवूडमध्ये फार काळ टिकेल असे मला वाटत नाही. हे वर्ष माझ्यासाठी शेवटचे असेल की काय? अशी शंका येतेय. साधारणपणे बॉलिवूडमध्ये कोणताही नवा आवाज पाच ते सात वर्षे ऐकला जातो. त्यानंतर आणखी एखादा आवाज त्यावर मात करतो.’ आता त्याच्या या परिस्थितीवर त्यालाच एक पर्याय सुचला आहे. त्याबद्दल तो सांगतो,‘मी कदाचित माझ्यावरच्या या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या गायकीवर मी लक्ष देऊन कठोर परिश्रम केले तर नक्कीच मी बरीच वर्षे बॉलिवूडमध्ये माझे स्थान कायम ठेवू शकतो. मी शांत आयुष्याचा आनंद लुटणारा व्यक्ती आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी माझा चाहतावर्ग बराच जमवला आहे. मला वाटतं, मी माझ्या चाहत्यांना त्यांच्या मानसिक त्रासातून मुक्त करू शकतो, हेच माझ्यासाठी खरं यश आहे. ’ बॉलिवूड ही इंडस्ट्रीच अशी आहे की, इथे स्पर्धेत टिकायचं तर सर्वांनाच आहे पण, त्यासाठी लागणारी सहनशक्ती मात्र सर्वांकडे नाही. गायकवर्गाचा काळ हा केवळ चार ते पाच वर्ष एवढाच असतो. नवनवीन कलाकार इंडस्ट्रीत डेब्यू करतात तशी नव्या गायकांचीही भरती होत राहते. त्यामुळे जुने गायक मागे पडतात. आता हेच पाहा ना, अरिजित सिंगलाही तीच भीती सतावतेय.