Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 14:32 IST

आमीर खानचा यावर्षीचा बहुचर्चित सिनेमा 'दंगल'चं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये आमीर खान सिनेमातील आपल्या चार ...

आमीर खानचा यावर्षीचा बहुचर्चित सिनेमा 'दंगल'चं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये आमीर खान सिनेमातील आपल्या चार मुलींसोबत दिसतोय.म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के? असंदेखील या पोस्टरवर संदेश देण्यात आलाय. स्वत: आमीर खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केलंय.  काही दिवसांपुर्वी आमीर खानने आपला रावडी लूकदेखील शेअर केला होता. ज्यामधील त्याची शरिरयष्टी पाहून घेतलेली मेहनत दिसत होती.या सिनेमात आमीर खान सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगाट यांची भुमिका  साकारतोय. कुस्तीपटू महावीर फोगाट यांच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ सिनेमा 23 डिसेंबरला नाताळच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.