Join us  

याचवर्षी सुरु होणार सलमानच्या 'दबंग 3'चे शूटिंग, अरबाज खानने केले कन्फर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 6:00 AM

सलमान खानच्या फॅन्ससाठी 2019 हे वर्ष खूप स्पेशल असणार आहे. त्याला कारणही तसेच आहे यावर्षी अखेरीस सलमानचा मल्टीस्टारर 'भारत' सिनेमा रिलीज होणार आहे आणि दबंग तिसऱ्या भागाची शूटिंग सुरु आहे

ठळक मुद्देलवकरच सलमानचा दबंग 3 फ्लोअरवर येणार आहे या सिनेमाचे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे

सलमान खानच्या फॅन्ससाठी 2019 हे वर्ष खूप स्पेशल असणार आहे. त्याला कारणही तसेच आहे यावर्षी अखेरीस सलमानचा मल्टीस्टारर 'भारत' सिनेमा रिलीज होणार आहे आणि दबंग तिसऱ्या भागाची शूटिंग सुरु आहे. सलमानचा भाऊ अरबाज खानने स्वत: ही गोष्ट कन्फर्म केली.     

सिनेमाला घेऊन अरबाज म्हणाला, ''होय, 'दबंग 3' एप्रिलमध्ये फ्लोरवर येणार आहे. मात्र अजून लोकेशन्सबाबत निर्णय होणे बाकी आहे. आता मी फक्त ऐवढेच सांगू शकतो की यात सलमान खान काम करणार आहे आणि प्रभूदेवा याचे दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा नोएडा पोलिसांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असणार आहे.'' या चित्रपटात पुन्हा एकदा सलमान आणि सोनाक्षीचीच जोडी जमणार आहे. याआधी सोनाक्षी सिन्हाने देखील या वर्षाच्या अखेरीस 'दबंग 3'चे शूटिंग सुरु होणार असल्याचे सांगितले होते. 

सध्या सलमान भारत सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सलमान आणि कॅटरिना भारतमध्ये एकत्र दिसणार आहे. प्रियांका चोप्रा बाहेर पडल्यानंतर सलमानची लकी चार्म कॅटरिना कैफला या सिनेमात कास्ट करण्यात आले. याशिवाय तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी हे अन्य कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘भारत’मध्ये सलमान खान १० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.  

टॅग्स :दबंग 3अरबाज खानसलमान खान