Join us  

अरबाज खानची दुसरी पत्नी शूराला आहे 8 वर्षांची मुलगी? सलमानने लग्न न करण्याचा दिलेला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 3:21 PM

शूराच्या आधीच्या आयुष्याबद्दल समजताच खान कुटुंबाचा होता लग्नाला विरोध

सलमान खानचा भाऊ अरबाज खानने (Arbaaz Khan) काही दिवसांपूर्वीच दुसरं लग्न करत सर्वांना धक्का दिला. २५ वर्ष छोट्या शूरा खानसोबत (Sshura Khan) तो लग्नबंधनात अडकला. शूरा खान मेकअप आर्टिस्ट आहे. ती याआधी रवीना टंडनसाठी काम करायची. रवीनासोबतच्या अरबाज खानच्या एका प्रोजेक्टमध्ये त्याची शूराशी ओळख झाली होती. काही महिने डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण शूराशी लग्न करण्यासाठी सलमान खानने अरबाजला पुन्हा एकदा विचार कर असा सल्ला दिला होता. तसंच शूराला पाहून खान कुटुंब फार काही खूश नव्हतं. याचं कारण नुकतंच समोर आलं आहे.

2017 मध्ये मलायकाला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज खान जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. पण शूरा त्याच्या आयुष्यात कधी आली याचा कोणालाच पत्ता लागला नाही. शूराशी लग्न करण्याचा अरबाजचा निर्णय त्याच्या दोन्ही बहिणी अर्पिता आणि अलवीराला आवडला नव्हता. कारण शूराचं याआधी लग्न झालं होतं आणि तिला 8 वर्षांची एक मुलगीही आहे. खान कुटुंबाला शूराच्या आधीच्या आयुष्याबद्दल माहित होतं. शूराने इंटेरियर डिझायनरशी लग्न केलं होतं. मात्र त्यांच्यातील मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला. माध्यम रिपोर्टनुसार शूराने पतीला लेकीपासून लांब ठेवलं. ती पतीला लेकीला भेटण्याची परवानगी देत नव्हती. ही गोष्ट तिने खान कुटुंबापासून लपवून ठेवली. मात्र जेव्हा तिच्याबद्दल हे कळलं तेव्हा अरबाजच्या दोन्ही बहिणी नाखूश होत्या.

सलमान खाननेही अरबाजला हे लग्न करुन नको, पुन्हा विचार कर असा सल्ला दिला होता. मात्र अरबाज निर्णयावर ठाम होता. त्यामुळे अखेर खान कुटुंबानेही सहमती दर्शवली आणि सर्वांनीच शूराला आपल्या कुटुंबात सदस्याचं स्थान दिलं.

टॅग्स :अरबाज खानसलमान खानसलीम खानबॉलिवूडलग्न