Join us

'या' सिनेमातून अरबाज खान घेतोय साऊथमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 16:20 IST

अरबाज खान लवकरच कन्नड सिनेमात डेब्यू करणार आहे. सिनेमाचे नाव 'व्हेअर इज माय कन्नडका' आहे. या सिनेमात गणेश आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ठळक मुद्देअरबाज खान लवकरच कन्नड सिनेमात डेब्यू करणार आहे सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असून बहुतांश सीन्स हे लंडनमध्ये शूट होणार आहेत

अरबाज खान सध्या दोन गोष्टींना घेऊन चर्चेत आहेत. एक त्याच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत येणार सिनेमा दबंग 3 ला घेऊन आणि दुसरं त्याच्या लव्ह लाईफला घेऊन. या व्यतिरिक्त ही अजून एक अरबाजच्या फॅन्ससाठी खास खबर आहे. 

अरबाज खान लवकरच कन्नड सिनेमात डेब्यू करणार आहे. सिनेमाचे नाव  'व्हेअर इज माय कन्नडका' आहे. या सिनेमात गणेश आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका आहेत. कन्नड आणि हिंदीमधील अनेक टेलिव्हिजन शोजचे दिग्दर्शन केलेल्या राज आणि दामिनी ही नवरा बायकोची जोडी  या आगामी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. एप्रिल महिन्यात या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असून बहुतांश सीन्स हे लंडनमध्ये शूट होणार आहेत. 'व्हेअर इज माय कन्नडका' चित्रपटाची कथा, पटकथा, स्टारकास्ट आणि प्री-प्रोडक्शन असे सगळे काही जुळून आले असून यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात युनायटेड किंगडममध्ये संपूर्णतः शूट होणार आहे. अरबाजच्या भूमिकेबाबत अजून कोणतेही अधिकृत घोषणा झालेली नाही. 

अरबाजचा 'दबंग 3' एप्रिलमध्ये फ्लोअरवर येणार आहे. यात सलमान खान काम करणार आहे आणि प्रभूदेवा याचे दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा नोएडा पोलिसांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असणार आहे. या सिनेमात पुन्हा एकदा सलमान आणि सोनाक्षीचीच जोडी जमणार आहे.  

टॅग्स :अरबाज खानदबंग 3