Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का-विराट एकमेकांबद्दल करताहेत तक्रार, पाहिलात का हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 19:59 IST

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला एक वर्ष होणार आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला एक वर्ष होणार आहे. हे दोघे ११ डिसेंबर, २०१७ला विवाहबंधनात अडकले होते. अनुष्का शर्माविराट कोहली हे दोघे मान्यवरचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत. गेल्या वर्षी या दोघांचा मान्यवरचा व्हिडिओ समोर आला होता. त्यात विराट व अनुष्का नेहमी एकमेकांची साथ सोडणार नाही, असे वचन देताना दिसले होते. आता एक वर्षानंतर त्यांचा नवा व्हिडिओ दाखल झाला आहे. 

ज्यात लग्नानंतरची कथा सांगण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये विराट व अनुष्का लग्नात पोहचतात व एकमेकांबद्दल वाईट बोलतात. मात्र शेवटी दोघे सदैव एकत्र राहणार असल्याचे बोलतात. त्यानंतर लग्न मोठ्या थाटामाटात पार पडते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप शेअर होत आहे. 

 दोघे मित्रमैत्रिणींच्या लग्नात गेले असून विराट आपल्या मित्राला म्हणतोय की लग्न कशाला करतो आहेस तर दुसरीकडे अनुष्का आपल्या मैत्रिणीला बघ विचार कर असे सांगते आहे. त्यानंतर ते दोघे एकमेकांबद्दल वाईट बोलताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. मात्र शेवटी त्यांच्या तक्रारी बंद होतात आणि त्यांच्या मित्र मैत्रिणींचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडते. हा व्हिडिओ मान्यवरची जाहिरात असून सध्या ही जाहीरात सोशल मीडियावर चांगलीच हिट होताना दिसते आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली