Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' देशात व्हॅकेशन एन्जॉय करतायेत विराट -अनुष्का, दिसला रोमँटीक अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 10:18 IST

कधी निसर्गाच्या सान्निध्यात तर कधी हॉटेलवर निवांत क्षण घालवत विश्रांती घेत असल्याचे विरूष्का या फोटोत पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देविराटसोबत रोमँटिक दिसली अनुष्का शर्मान्यूझीलँडमध्ये करताय व्हॅकेशन एन्जॉय कधी निसर्गाच्या सान्निध्यात तर कधी हॉटेलवर निवांत क्षण घालवत आहेत हे कपल

सुरुवातीपासूनच विराटचं अनुष्कावर जीवापाड प्रेम होतं. अनुष्काबाबत विराट जरा जास्तच पझेसिव्ह असल्याचंही वेळोवेळी पाहायला मिळालं. विराट आणि अनुष्काची केमिस्ट्री सा-यांनीच पाहिली आहे. आता पुन्हा हे कपल चर्चेत आहेत. याला निमित्त ठरली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेले दोघांचे हे फोटो.  दोघांच्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यात त्यांचे चाहते उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर या दोघांचे रोमँटीक फोटो व्हायरल झाले आहेत. विराट-अनुष्का या लव्हबर्ड्सची केमिस्ट्री अशी काही तुफान हिट ठरली आहे की त्यांच्या या फोटोंवर खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचाही वर्षाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.  

दोघांचा अंदाज, स्टाईल सारं काही त्यांच्या फॅन्ससाठी लक्षवेधी ठरत आहे. कारण कामातून वेळ काढत दोघेही मस्त व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. सध्या विराट आपल्या लेडी लव्हसह न्यूझीलँडमध्ये क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दोघांचाही रोमँटीक अंदाज पाहायला मिळतोय. फोटोत दोघेही मस्त कामातून ब्रेक घेत फुल ऑन व्हेकेशन मूडमध्ये दिसतायेत. कधी निसर्गाच्या सान्निध्यात तर कधी हॉटेलवर निवांत क्षण घालवत विश्रांती घेत असल्याचे विरूष्का या फोटोत पाहायला मिळत आहे. यापूर्वीही एकमेकांबद्दल असलेले प्रेम काही ते जगापासून लपवून ठेवू शकले नाहीत अगदी तसेच आताही पाहायला मिळतंय. विराट आणि अनुष्काचं बॉडिंग, एकमेंकांवर असलेले प्रेम पुन्हा एकदा पाहायला मिळतंय.

'झिरो' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी विराट कोहलीचंही शाहरुखनेही कौतुक केले होते. आपण एक स्वप्नवत जीवन जगलो आहोत आणि विराटसुद्धा एक दैवी देणगी लाभलेला एक व्यक्ती आहे असे गौरवोद्गार शाहरुखने काढले होते. यावेळी कोणत्या क्रिकेटरने झीरोवर आऊट व्हावं आणि झीरो सिनेमाचं प्रमोशन करावं असं वाटतं असा प्रश्न शाहरुखला विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देण्याआधी शाहरुखने आधी हळूच अनुष्काकडे पाहिलं. शाहरुखने पाहताच अनुष्काही आपलं हसू रोखू शकली नाही. भारतीय क्रिकेटरबाबत काहीही बोललो तर माझ्या शेजारी असलेल्या अनुष्काला राग येईल. कारण ती मिसेस क्रिकेटर आहे असं उत्तर शाहरुखने यावेळी दिलं होते.