Join us

"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 15:44 IST

Anushka Sharma post for Virat Kohli: "प्रत्येक कसोटी मालिकेनंतर तू..." अनुष्काने विराटसाठी काय लिहिलं?

Anushka Sharma post for Virat Kohli: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या या निर्णयानंतर सर्व क्रिकेटप्रेमी भावुक झाले आहेत. टेस्ट क्रिकेटमधील त्याचा १४ वर्षांचा प्रवास थांबला आहे. सर्व क्षेत्रातून विराटला भावुक निरोप मिळत आहे. त्याच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आहेत. विराटच्या मागे कायम खंबीरपणे उभी राहणारी त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma) आता सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

काय आहे अनुष्का शर्माची पोस्ट?

अनुष्काने विराटचा कसोटी सामन्यानंतरचाच एक फोटो शेअर करत लिहिले, "क्रिकेटविश्वात तू रचलेले विक्रम आणि माईलस्टोन याबद्दल सगळे बोलतील...पण या सगळ्यात तू सर्वांपासून लपवलेले अश्रू, कोणीही न पाहिलेला संघर्ष आणि या खेळावर तुझं असलेलं अढळ प्रेम हे सगळं मी पाहिलं आहे. मला माहितीये या दरम्यान तू काय काय गमावलं आहेस. प्रत्येक कसोटी मालिकेनंतर तू आणखी अनुभवी, आणखी थोडा नम्र होऊन परत आलास...या प्रवासात तुझी प्रगती होत असताना पाहणं हे खरोखर माझं भाग्यच."

ती पुढे लिहिते, "तरी, एक दिवस तू व्हाईट बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार याची कल्पना होतीच. पण तू कायम तुझ्या मनाचं ऐकलंस आणि माय लव्ह आज मला तुला हेच सांगायचंय की तुला मिळत असलेला हा भावुक निरोप यासाठी तू नक्कीच पात्र आहेस."

विराट कोहलीची कसोटी कारकिर्द

विराट कोहलीनं  २० जून २०११ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. १२३ कसोटी सामन्यात ३० शतकांसह ३१ अर्धशतकांच्या जोरावर त्याने कसोटीत ९२३० धावा केल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक ७ द्विशतकाचा विक्रम त्याच्या नावे आहे. २५४ ही कसोटीतील विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीबॉलिवूड