याठिकाणी विरूष्का शॉपिंग करत आहेत. आता तुम्ही म्हणाल, शॉपिंग करण्यात गैर काय? आमच्यासाठी तसे काहीही गैर नाही. पण काही लोकांनी मात्र विरूष्काच्या या शॉपिंगमध्ये भलतेच काही शोधून काढले आहे. होय, विरूष्का ज्या दुकानात शॉपिंग करत आहेत, त्याठिकाणी ५० टक्के सूट दिली जात आहे.
म्हणजेच. दुकानात सेल लागलाय आणि याठिकाणी विरूष्का शॉपिंग करत आहेत. याचमुळे चाहत्यांनी विरूष्काला टार्गेट केले आहे. ट्रोलर्सनी विरूष्काच्या या शॉपिंग फोटोवर अनेक मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. यातील अनेक कमेंट्स वाचून तुम्ही पोट धरून हसाल, यात शंका नाही.
ALSO READ : सासरी पोहोचली अनुष्का शर्मा...देसी लूकमधील फोटो व्हायरल!
विराट व अनुष्का अलीकडे ११ डिसेंबला लग्नबंधनात अडकलेत. विराट आणि अनुष्का या दोघांमध्ये २०१३ पासून अफेअर सुरु होते. एका कमर्शिअलच्या शूटवेळी दोघांचीही भेट झाली होते. अर्थात २०१५ च्या सुरुवातीला दोघांचेही ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. मात्र यानंतर मार्च २०१६ मध्ये दोघेही एकत्र दिसले आणि यांच्या प्रेमाच्या चर्चा पुन्हा होऊ लागल्या. गत वर्षी दोघांनीही डेहराडून येथे नाताळ साजरा केला होता. युवराज सिंह व हेजल किच हे दोघे त्यांचे खास अतिथी होते. यावर्षी मे महिन्यात जहिर खान व सागरिका घाटगे यांच्या साखरपुड्याला दोघेही लव्हबर्ड्स एकत्र पोहोचले होते.