काय लपवताहेत अनुष्का शर्मा अन् विराट कोहली ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 15:54 IST
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लव्ह बर्ड्स सगळे काही खुलेआम करतात, पण तरिही स्वत:चे नाते ‘सीक्रेट’ असल्याचे भासवतात. ...
काय लपवताहेत अनुष्का शर्मा अन् विराट कोहली ?
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लव्ह बर्ड्स सगळे काही खुलेआम करतात, पण तरिही स्वत:चे नाते ‘सीक्रेट’ असल्याचे भासवतात. होय, सध्या याच कारणाने हे लव्ह बर्ड्स चर्चेत आहे. श्रीलंका टेस्ट सीरिज संपली आणि ‘जब हॅरी मेट सेजल’ फ्लॉप झाल्याचे फारसे मनावर न घेता अनुष्का गुपचूप श्रीलंकेत पोहोचली. कशाला, तर विराटसोबत वेळ घालवायला. (विराटने अलीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नऊ वर्षे पूर्ण केलीत. त्याच्या सेलिब्रेशनसाठीच अनुष्का श्रीलंकेत पोहोचल्याचे कळतेय.)आता एकत्र तर एकत्र. पण अनुष्का व विराटने आधी हे सगळे लपवून ठेवण्याचे प्रयत्न केलेत. म्हणजे, दोघांनीही श्रीलंकेत मस्तपैकी धम्माल मस्ती केली पण चाहत्यांपासून मात्र लपवून ठेवले. कसे? तर अनुष्का व विराट दोघांनीही सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलेत. पण वेगवेगळे. म्हणजे, या फोटोत आपण दोघेही एका फ्रेममध्ये येणार नाहीत, याची काळजी त्यांनी घेतली. का? हे मात्र आम्हाला ठाऊक नाही. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत विराट व अनुष्का एकत्र नाहीत. पण ठिकाण मात्र एकच आहे. आता एकाच ठिकाणी असून नातं जगजाहिर असताना विराट व अनुष्का लोकांपासून काय लपवू पाहताहेत, हेच कळायला मार्ग नाही. कदाचित विराट व अनुष्का चाहत्यांची मज्जा तर घेत नसावेत? अनुष्का व विराटचा इरादा काहीही असो, चाहत्यांचे मात्र यातूनही मनोरंजन होतेय, हेच खरे. कारण दोघांचेही फोटो वेगाने व्हायरल होत आहे. कालच दोघांचा एकत्र वृक्षारोपण करतानाचा फोटो असाच वेगाने व्हायरल झाला होता.