Join us

​संजय दत्त बायोपिकमध्ये अनुष्का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 20:09 IST

अनुष्का शर्माचे सध्या ‘बहोत अच्छे दिन’ सुरू आहे असे म्हणावे लागेल. या वर्षी ‘सुल्तान’च्या निमित्ताने ईदला बॉक्स आॅफिसवर धमाल ...

अनुष्का शर्माचे सध्या ‘बहोत अच्छे दिन’ सुरू आहे असे म्हणावे लागेल. या वर्षी ‘सुल्तान’च्या निमित्ताने ईदला बॉक्स आॅफिसवर धमाल उडवून दिल्यानंतर ती आता दिवाळीत ‘ऐ दिल है मुश्किल’सह धमाका करण्यास सज्ज झाली आहे. एवढेच नाही तर राजकुमार हिरानी बनवत असलेल्या संजय दत्त बायोपिकमध्ये तिला पाहुणी कलाकार म्हणून येण्याची आॅफर देण्यात आली आहे. हिरानींसोबत ‘पीके’मध्ये काम केल्यापासून दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली होती. तिची भूमिका काय असणार हे मात्र सिक्रेट आहे. रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका करत असून स्वत: संजू बाबादेखील यामध्ये छोट्याशा रोलमध्ये दिसणार आहे. याच महिन्यात चित्रपटाची शूटींग सुरू होणार होती मात्र आता ती जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. अनुष्का सध्या प्रागमध्ये शाहरुखसोबत इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे.