अनुष्काचा प्रोत्साहनपर संदेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 04:22 IST
अनुष्का शर्मा सध्या दोन बाबींमुळे इंडस्ट्रीत चर्चेत आहे.
अनुष्काचा प्रोत्साहनपर संदेश!
अनुष्का शर्मा सध्या दोन बाबींमुळे इंडस्ट्रीत चर्चेत आहे. एक म्हणजे तिचा आगामी चित्रपट सलमानसोबत ‘सुल्तान’ची ती शूटींग करत आहे. तर दुसरे म्हणजे विराट कोहलीसोबत तिचे पुन्हा एकदा पॅचअप होणार आहे. अनुष्काने नुकताच ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आहे. ‘महिला’ असण्याची व्याख्या तुम्ही तिचा संदेश वाचल्यानंतर समजू शकाल. तिने ‘स्ट्राँग वुमन लिफ्ट इच अदर्स अप’ असा एक संदेशचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, मी माझ्या अवतीभोवती असणाºया महिलांचा नेहमीच आदर करत आले. आयुष्यात अप्स अॅण्ड डाऊन्स हे चालूच असतात. महिला खुप सहनशील, शांत आणि खंबीर असतात. त्यांच्यात सामर्थ्य असते. मुर्खासारखे वागू नका. जोपर्यंत तुम्ही स्वत:ला महत्त्व देणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी महत्त्व देणार नाही. प्रियंका चोप्रा अनुष्काच्या संदेशाने भारावून गेली आणि तिनेही अनुष्काला शुभेच्छा दिल्या.