Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अनुष्का व विराटमध्ये पुन्हा फाटले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 12:41 IST

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यात पुन्हा फाटल्याची खबर आहे. दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. अनुष्का शर्मा तिच्या आगामी ...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यात पुन्हा फाटल्याची खबर आहे. दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. अनुष्का शर्मा तिच्या आगामी ‘दी रिंग’ या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सूक आहे. या चित्रपटाचे शूटींग संपवून अनुष्का लवकरच ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होणार आहे. पण अनुष्काच्या बिझी शेड्यूडमुळे अनुष्का व विराटच्या नात्यात दुरावा आलेला नाही. तर याचे कारण काही वेगळेच आहे. होय,सूत्रांचे मानाल तर, विराटला लग्नाची घाई झाली होती. अनुष्कासोबत लग्न करून विराट सेटल होऊ इच्छित होता. मात्र अनुष्का तिच्या करिअरबाबत बरीच फोकस आहे. इतक्यात तरी तिचा लग्नाचा अजिबात विचार नाही. याच कारणामुळे मध्यंतरी दोघांमध्ये मतभेद झाले होते. मात्र टी-२० दरम्यान अनुष्काच्या एक मॅसेजने हे मतभेद दूर झाले होते. पण आता हे मतभेद पुन्हा वाढले असल्याचे कळतेय. विराटचे पजेसिव नेचर अनुष्काला खटकू लागले आहे. आता इतके सगळे विकोपाला गेले असेल तर या नात्याचे भविष्य विराट आणि अनुष्का यांच्याच काय ते हातात आहे.