Join us

चक्क पोर्न वेबसाइटवर बघावयास मिळतो अनुपम खेरचा ‘हा’ चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 17:44 IST

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचा एक चित्रपट सध्या भलताच चर्चेत आला आहे. त्यास कारणही तसेच असून, त्यांचा हा ...

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचा एक चित्रपट सध्या भलताच चर्चेत आला आहे. त्यास कारणही तसेच असून, त्यांचा हा चित्रपट चक्क एका पोर्न वेबसाइटवर बघावयास मिळत आहे. होय, अनुपम यांचा ‘द बिग सिक’ हा हॉलिवूडपट कोणीतरी ‘पोर्नहब’ या साइटवर अपलोड केला. या चित्रपटात अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका आहे. काही महिन्यांपूर्वीच हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. आता हा चित्रपट पोर्न साइटवर दिसत असल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही बाब जेव्हा चित्रपटातील अभिनेता कुमॅल नान्जियानी याच्या लक्षात आली तेव्हा त्याने ट्विटरवर याबाबतची माहिती दिली.  त्याने केलेल्या एका मजेशीर ट्विटमध्ये म्हटले की, ‘ज्या प्रेक्षकांकडे अमेजनचे प्राइम सबस्क्रिप्शन नाही अन् ते हा चित्रपट खरेदी करू शकत नाही, अशा प्रेक्षकांना पोर्नहब या साइटवर चित्रपट मोफत बघावयास मिळणार आहे. आता तुम्ही हे नका विचारू की, मला हे सर्व कसे कळाले? पण ही मस्करी नसून खरं आहे.’ दरम्यान, कुमॅलच्या ट्विटनंतर लगेचच पोर्न वेबसाइटकडून त्याच्या ट्विटला उत्तर देण्यात आले. वेबसाइटने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘हा चित्रपट आमच्या वेबसाइटवरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, परंतु आम्ही त्यात अपयशी ठरत आहोत.’वेबसाइटच्या या ट्विटची पुन्हा खिल्ली उडविण्यासाठी कुमॅलने ट्विट करताना लिहिले की, ‘हा चित्रपट पोर्न वेबसाइटवरून काढला जावा अशी माझी इच्छा नाही.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मायकल शॉल्टर यांनी केले. हा चित्रपट कॉमेडीवर आधारित आहे. १४ जुलै २०१७ रोजी रिलिज झालेल्या या चित्रपटात कॉमेडियन कुमॅल नान्जियानी याची मुख्य भूमिका आहे.