Join us

​अनुपम खेर जीममध्ये, सलमानने उडविली खिल्ली !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 12:43 IST

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेरने आपल्या विविधांगी अभिनयातून एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सध्या अनुपम खेर सोशल मीडियावरही ...

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेरने आपल्या विविधांगी अभिनयातून एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सध्या अनुपम खेर सोशल मीडियावरही सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह आहेत. विशेष म्हणजे ६१अनुपम खेर जिममध्ये जाऊन सुदृढ राहण्यासाठी कठोर मेहनत करताना दिसत आहेत. त्यामुळे यांचे जिममधील एक्सरसाईज करतानाचे फोटो बॉलिवूडचा दबंग खान सलमानने आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहेत. तसेच त्यावरील कमेंटमध्ये सलमानने अनुपम खेर यांना चिमटे काढले आहेत.सलमानने आपल्या ट्वीटमध्ये ‘उपरवाला, बॉडी बिल्डर्स की खेर करे’ असे म्हटले आहे.सलमानच्या या ट्वीटला खेर यांनी फेसबूकवरुन उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या फेसबूक पेजवर, ‘माझे फोटो ट्वीटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याबद्दल सलमानचे आभार मानतो. मला तुझी कमेंट आवडली. जय हो,’ असे लिहले आहे