Join us

OMG! अनुपम खेर यांच्या डोक्यावर उगवले केस, रस्त्यावर निघताच अशी झाली स्थिती!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 15:30 IST

अनुपम यांनी सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अगदी पोट धरून हसाल.

ठळक मुद्देअनेक अविस्मरणीय भूमिका साकारणारे आणि अत्यंत प्रशंसनीय कामगिरी करणारे अभिनेते अनुपम खेर यांना प्रचंड मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असतात. रोज नवे व्हिडीओ, फोटो ते शेअर करतात. कधी फिटनेसमुळे तर कधी आपल्या अतरंगी वागण्यामुळे अनुपम सतत चर्चेत असतात. त्यांचा ताजा व्हिडीओही असाच. अनुपम यांनी सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अगदी पोट धरून हसाल.होय, या व्हिडीओत अनुपम यांनी डोक्यावर एक dreadlock लावला आहे. अर्थात एक विग लावला आहे. केसांच्या लांबच लांब लटांचा हा विग घालून अनुपम कॅटवॉक करत आहेत आणि याचदरम्यान अचानक वीजांचा कडकडाट सुरु होतो. ‘बाल लगाते ही बिजली गिरी...,’ असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.

अनुपम यांचा हा व्हिडीओ चांगलाच मजेशीर आहे. तेव्हा पाहा आणि पोटभर हसा.

‘सारांश’ या आपल्या पाहिल्याच चित्रपटात केलेल्या 65 वर्षांच्या वृद्ध निवृत्त शिक्षकाच्या भूमिकेपासून ते ‘न्यू अ‍ॅमस्टरडॅमस्’ या आंतरराष्ट्रीय मालिकेतील डॉक्टर विजय कपूर या भूमिकेपर्यंत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारणारे आणि अत्यंत प्रशंसनीय कामगिरी करणारे अभिनेते अनुपम खेर यांना प्रचंड मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे.

ते गेल्या 35 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत असून त्यांनी आजवर अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. अनुपम खेर यांचा जीवनप्रवास कधीच सोपा नव्हता. मात्र ‘सारांश’ सिनेमानंतर आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि अभिनयामुळे त्यांनी रसिकांची मने जिंकली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 

टॅग्स :अनुपम खेर