Join us  

डिप्रेशनने घेतला आणखी एक बळी, प्रसिद्ध आर्टीस्ट राम इंद्रनील कामतचा बाथटबमध्ये सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 12:10 PM

राम इंद्रनील कामत मोठ्या कालावधीपासून तणावात होता आणि लॉकडाउनमध्ये त्याची स्थिती आणखी वाईट झाली होती, असे समजते आहे.

प्रसिद्ध आर्टिस्ट राम इंद्रनील कामत याचे निधन झाले आहे. वयाच्या 41व्या वर्षी राम इंद्रनील कामत त्याच्या मुंबई माटुंगा येथील घरातील बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ही आत्महत्येची केस असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. राम इंद्रनील कामतच्या निधनाने त्याच्या कुटुंबियांना आणि निकटर्वीयांना धक्का बसला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार राम इंद्रनील कामत बुधवारी दुपारी तीन वाजता बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. अद्याप त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही.

पोलिसांनी प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ही आत्महत्येची केस असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. रामने आपल्या सुसाईड नोटमध्ये कुणालाही या घटनेसाठी जबाबदार ठरवलेले नाही. पोलीस राम इंद्रनील कामतच्या कुटुंबिय आणि निकटर्वीयांची चौकशी करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार राम इंद्रनील कामत मोठ्या कालावधीपासून तणावात होता आणि लॉकडाऊनने त्याची स्थिती आणखी वाईट झाली होती. तो आपल्या आईसोबत राहात होता.

टॅग्स :गुन्हेगारी