Join us

​‘उडता पंजाब लीक’ प्रकरणात आणखी एक ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 10:59 IST

सेन्सॉर बॉर्डाशी वादामुळे चर्चेत असणारा ‘उडता पंजाब’ अखेर नियोजित तारेखेलाच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरला.मात्र रिलीज होण्याआधीच ...

सेन्सॉर बॉर्डाशी वादामुळे चर्चेत असणारा ‘उडता पंजाब’ अखेर नियोजित तारेखेलाच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरला.मात्र रिलीज होण्याआधीच कोणी तरी सिनेमाची कॉपी इंटरनेटवर लीक केली. सेन्सॉर बोर्डातीलच कोणाचा तरी हा खोडसाळपणा असेदेखील आरोप करण्यात आले.मात्र काही दिवसांपूर्वी सायबर पोलिसांनी निर्मात्यांच्या तक्रारीवरून दिल्लीमध्ये दीपक कुमार यास अटक केली. दीपकचा आणि बोर्डाचा काहीच संबंध नाही.मग त्याच्याकडे चित्रपटाची कॉपी आलीच कशी हा प्रश्न होता.दीपकला मुंबईला आणले असता त्याने खुलासा केला की, त्याने ‘९एक्स डॉट कॉम’ या वेबसाईटवरून कॉपी डाऊनलोड करून स्वत:च्या वेब पोर्टलवर टाकली होती. म्हणजे दीपकच्या आधी दुसºया कोणी तरी कॉपी लीक केली होती.सध्या ‘९एक्स डॉट कॉम’ ही वेबसाईट बंद असून पोलिस अधिक तपास करत आहेत. याचा अर्थ हे प्रकरण लवकर निवळण्याची शक्यता दिसत नाहीए.