Join us

​ बॉलिवूडमध्ये दिसणार आणखी एक पाकिस्तानी चेहरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 21:45 IST

होय, बॉलिवूडमध्ये आणखी एक पाकिस्तानी अभिनेत्री पदार्पण करतेय. ‘हॅपी भाग जाएगी’च्या ट्रेलर रिलीजनंतर ही पाकी अभिनेत्री चर्चेत आहे. ‘हॅपी ...

होय, बॉलिवूडमध्ये आणखी एक पाकिस्तानी अभिनेत्री पदार्पण करतेय. ‘हॅपी भाग जाएगी’च्या ट्रेलर रिलीजनंतर ही पाकी अभिनेत्री चर्चेत आहे. ‘हॅपी भाग जाएगी’मध्ये डायना पेंटी, जिमी शेरगिल, अली फजल, अभय देओल अशी स्टारकास्ट आहे. या सर्वांसोबत  सुंदर  चेहºयाची एक पाकिस्तानी अभिनेत्रीही यात दिसणार आहे. होय, मोमल शेख असे तिचे नाव. मोमल शेख पाकिस्तानातील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिचे पप्पा जावेद शेख यांना आपण पाकिस्तानचे ‘अमिताभ बच्चन’ म्हणू शकतो. मोमल आता बॉलिवूडमध्ये पर्दापण करतेय. विशेष म्हणजे मोमल विवाहित आहे आणि एका मुलाची आई आहे. लग्नानंतरही तिचे अभिनयातील करिअर सुरु आहे. ‘हॅपी भाग जाएगी’मध्ये मोमलची भूमिका लहानशी असली तरी महत्त्वाची आहे. तेव्हा बघूयात, यानंतर मोमल बॉलिवूडमध्ये स्वत:ची कशी ओळख निर्माण करते ते!!