Join us

‘कनेडा’ मध्ये अनुष्का-अर्जुन येणार एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 18:21 IST

अनुष्का शर्मा ही सध्या ‘सुल्तान’ रिलीज झाल्याने जाम खुश आहे. तिचा आगामी चित्रपट ‘फिलौरी’ची शूटींग पूर्ण करण्यात आली आहे. ...

अनुष्का शर्मा ही सध्या ‘सुल्तान’ रिलीज झाल्याने जाम खुश आहे. तिचा आगामी चित्रपट ‘फिलौरी’ची शूटींग पूर्ण करण्यात आली आहे. ती आता अर्जुन कपूर सोबत ‘कानेडा’ चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘एनएच १०’ नवदीप सिंग यांनी केले आहे. ‘अनुष्का ही कानेडाचा भाग असणार आहे. हा चित्रपट देखील तीच करणार असून चित्रपटात महत्त्वाची भूमिकाही ती बजावणार आहे. अर्जुन क पूरसोबत ती दिसणार असण्याची शक्यता आहे. अर्जुनसोबत चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. पंजाबमध्ये कॅनडाला कानेडा म्हणतात. पण, कानेडा हा काही कॉमेडी चित्रपट नाही. आणि ‘एन एच १०’ सारखा गंभीर चित्रपट देखील नाहीये. यात अनुष्का-अर्जुन दोघेही प्रथमच एकत्र दिसतील