Join us

सुशांत सिंग रजपूतच्या फॅन्सना अंकिता लोखंडे विचारतेय काय चूक आहे माझी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 19:11 IST

माझ्या आणि सुशांतच्या नात्याविषयी काहीही माहीत नसलेले लोक देखील माझ्यावर कमेंट करत आहेत असे अंकिताने म्हटले आहे.

ठळक मुद्देअंकिताने पुढे म्हटले आहे की, माझ्या आणि सुशांतच्या नात्याविषयी काहीही माहीत नसलेले लोक देखील माझ्यावर कमेंट करत आहेत.

सुशांत सिंग रजपूतची पूर्वप्रेयसी अंकिता लोखंडेला अनेकवेळा सुशांतच्या फॅन्सकडून सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. अंकिताने यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण आता अंकिताने या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. 

अंकिता नुकतीच इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती. त्यावेळी अनेकजणांनी तिच्या या पोस्टवर वाईट कमेंट लिहिल्या होत्या. त्यानंतर तुम्हाला पटत नसेल तर मला अनफॉलो करा असे अंकिताने म्हटले आहे. ट्रोलिंगकडे मी लक्ष पण देत नाही. पण या सगळ्याचा माझ्या पालकांना खूप त्रास होतो. कारण ते या इंडस्ट्रीचा भाग नाहीयेत असे अंकिताने म्हटले आहे. 

अंकिताने पुढे म्हटले आहे की, माझ्या आणि सुशांतच्या नात्याविषयी काहीही माहीत नसलेले लोक देखील माझ्यावर कमेंट करत आहेत. कोणत्याही नात्याविषयी माहीत नसताना त्यावर तुमचे मत व्यक्त करणे चुकीचे आहे. आमचे नाते तुटत होते, तेव्हा लोक कुठे होते... आता का प्रत्येकजण आपले मत व्यक्त करत आहेत आणि आमच्यावर तुम्ही खरंच प्रेम करता तर अशाप्रकारे कमेंट का करता... माझी काहीही चूक नसताना माझ्यावर आरोप का केले जात आहेत. प्रत्येकाची आपापल्या आयुष्यात वेगळी स्वप्नं असतात. सुशांतला खूप मोठे बनायचे होते आणि तो बनला देखील... या सगळ्यात माझी चूक काय... मला सतत का ऐकवले जाते. 

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत