Join us

​अंकिता लोखंडेने पोस्ट केला कुशाल टंडनसोबतचा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2017 10:14 IST

अंकिता लोखंडेने सोशल अकाऊंटवर पोस्ट केलेला एक फोटो. होय, अंकिताने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात ती कुशाल टंडनसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसतेय. हा फोटो शेअर करताना अंकिताने त्याला एक गर्भित कॅप्शन दिले आहे.

अंकिता लोखंडे सध्या काय करतेय? कदाचित सध्या अंकिता ‘मुव्ह आॅन’च्याच मूडमध्ये आहे. सुशांत सिंह राजपूतसोबतच्या ब्रेकअपनंतर अंकिताने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि ती त्यात ब-यापैकी यशस्वीही झाली. अलीकडे अंकिताचे नाव मुंबईचा एक बिझनेसमॅन विकास जैनसोबत जोडले गेले. अर्थात अंकिताने ही निव्वळ अफवा असल्याचे सांगितले. ‘कहाणी तर सगळीच बाहेर आली. लोकांना आता काय हवे आहे. मी लोकांना कुठलेही स्पष्टीकरण देणार नाही. ते माझे मित्र आहेत. लोकांच्या मते,मी ज्यांच्यासोबत मैत्री करू इच्छिते, त्यांच्यासोबत डेट करायला लागते. त्यामुळे बोलण्यात काहीही अर्थ नाही. खरे तर अशा बकवास गोष्टींची मला मुळीच पर्वा नाही. गेल्या वर्षभरापासून स्वत:बद्दल अशा बातम्या ऐकून मी थकलेय. मी जेव्हा केव्हा कुणाला डेट करेल, तेव्हा स्वत: सांगेल, असे अंकिता म्हणाली होती.आता अंकिताबद्दल हे सगळे सांगण्याचा उद्देश काय तर, तिने सोशल अकाऊंटवर पोस्ट केलेला एक फोटो. होय, अंकिताने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. यात ती कुशाल टंडनसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसतेय. हा फोटो शेअर करताना अंकिताने त्याला एक गर्भित कॅप्शन दिले आहे.‘अनपेक्षित मैत्री सगळयांत योग्य असते,’ असे तिने लिहिले आहे. केवळ अंकितानेच नाही तर कुशानेही एक फोटो शेअर केला आहे. यात तो अंकितासोबत दिसतोय. हा फोटो एक मिरर इमेज आहे. हे फोटो पाहून एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे, कुशाल व अंकिताला अफवांमुळे काहीही फरक पडत नाही. त्यांच्याबद्दल लोक काय बोलतील, याची त्यांना पर्वा नाही. कुशाल व अंकिता दीर्घकाळापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आता दोघांनीही एखाद्या प्रोजेक्टसाठी एकत्र यावे, इतकेच काय, हे फोटो पाहून आम्हाला वाटतेय.