Join us
Daily Top 2Weekly Top 5

  पाहा, ‘मणिकर्णिका’त झलकारी बाई बनलेल्या अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 14:31 IST

‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या आगामी चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारणा-या कंगना राणौतचा लूक आपण पाहिला. आता या चित्रपटात झलकारी बाई साकारणा-या अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

ठळक मुद्दे अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची एक्स- गर्लफ्रेन्ड  अंकिता दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये संधीच्या शोधात होती. अखेर कंगनाने तिला ब्रेक दिला आणि  ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात अंकिताची वर्णी लागली. हा अंकिताचा डेब्यू सिनेमा आहे. 

माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या आगामी चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारणा-या कंगना राणौतचा लूक आपण पाहिला. आता या चित्रपटात झलकारी बाई साकारणा-या अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक समोर आला आहे. होय, यात झलकारी बाई बनलेली अंकिता खांद्यावर बंदूक घेऊन दिसतेय.  अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची एक्स- गर्लफ्रेन्ड  अंकिता दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये संधीच्या शोधात होती. अखेर कंगनाने तिला ब्रेक दिला आणि  ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात अंकिताची वर्णी लागली. हा अंकिताचा डेब्यू सिनेमा आहे. 

 सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाईने आपले शौर्य आणि बुद्धिचातुयार्ने राणी लक्ष्मीबाईच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते.   इंग्रज सेनानी ह्यू रोज याच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर निकराचा हल्ला केला असता, झलकारीबाईच्या सल्ल्यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. यादरम्यान झलकारीबाई यांनी राणीप्रमाणे वेश धारण करून ह्यू रोजच्या सैन्याशी युद्ध केले. पण ते नाटक इंग्रज सैनिकांना समजले. त्यांनी झलकारीबाइंर्ना पकडले व फासावर लटकवले होते. झलकारीबाइंर्ची हीच शौर्यगाथा अंकिता पडद्यावर जिवंत करणार आहे.

  सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे हे दोघे सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण २०१६ मध्ये दोघांचेही ब्रेकअप झाले होते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर भेटलेले हे लव्हबर्ड्स कधीकाळी वेगवेगळ्या वाटांना जातील, असे कुणालाही वाटले नव्हते. पण तसे झाले. अंकिताचा चिडका, संशयी स्वभाव आणि तिचे वाढते दारूचे व्यसन यामुळे सुशांतने तिला सोडल्याची चर्चा यानंतर रंगली होती. क्रिती सॅनन आयुष्यात आल्याने सुशांतने अंकिताला सोडले, अशीही चर्चा होती.  या ब्रेकअपनंतर स्वत:ला सावरणे अंकितासाठी बरेच कठीण गेले. पण आता अंकिता या ब्रेकअपच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलीयं. 

टॅग्स :माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीअंकिता लोखंडे