Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिताने केला सुशांतला कॉल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:42 IST

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेपासून सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचे नाते तयार झाले. नात्याचे प्रेमात रूपांतर झाले आणि कालांतराने ...

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेपासून सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचे नाते तयार झाले. नात्याचे प्रेमात रूपांतर झाले आणि कालांतराने त्यांच्यात ब्रेक-अप देखील झाला. बे्रक-अपनंतर त्या दोघांनाही मीडियाने चांगलेच प्रश्न विचारून भंडावून सोडले.एका मुलाखतीत अंकिताविषयी प्रश्न विचारण्यात आल्यावर सुशांतने सांगितले की, ‘मी तिच्या परवानगीशिवाय तिच्याविषयी काहीही सांगू शकत नाही.’ मात्र, अजूनही त्यांच्यातील प्रेम कायम असल्याची जाणीव नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे झाली.झालं असं की, ‘सुशांतचा चित्रपट ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ रिलीज झाला आणि चित्रपटाचा पहिला शो त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने फ्रेंड्ससोबत जाऊन पाहिला. चित्रपट तिला खूप आवडला आणि तिने घरी आल्यावर पहिला फोन सुशांतला केला. त्याचा अभिनय, कथानक आणि त्याचा कामाबद्दलचा प्रामाणिकपणा याविषयी त्याचे कौतुक केले. बरं, तर मग अंकिता तुझे हृदयपरिवर्तन होतेय की काय?