Join us  

'ॲनिमल'चा फ्रेडी अर्थात मराठमोळ्या उपेंद्र लिमयेचा नवा हिंदी सिनेमा, पुन्हा दिसणार रॉकींग अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 12:44 PM

'ॲनिमल' मधील फ्रेडी गाजवून आता उपेंद्र लिमये बॉलिवूडच्या नव्या सिनेमात काम करण्यासाठी उत्सुक आहे

रणबीर कपूरचा 'ॲनिमल' सिनेमा चांगलाच गाजला. 'ॲनिमल' २०२३ चा सुपरहिट सिनेमा म्हणून ओळखला जातो.  'ॲनिमल' सिनेमात फ्रेडीच्या विशेष भूमिकेत मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेने चांगलाच भाव खाल्ला. उपेंद्रने छोट्याश्या भूमिकेत संपूर्ण सिनेमात छाप पाडली. आता उपेंद्रचा नवा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नाव 'मडगाव एक्सप्रेस'. सिनेमातील उपेंद्रचा जबरदस्त लूक समोर आलाय. 

उपेंद्र लिमयेचा 'मडगाव एक्सप्रेस' मधील रॉकींग अंदाज असलेला व्हिडीओ समोर आलाय. व्हिडीओत पाहायला मिळतं की, उपेंद्र डोक्याचा आधार घेऊन उलटा झालेला दिसतोय.  'मडगाव एक्सप्रेस' मध्ये उपेंद्र 'मेंडोझा' हे अतरंगी पात्र साकारताना दिसणार आहे. त्यामुळे 'ॲनिमल' मधील फ्रेडी गाजवून उपेंद्र  'मडगाव एक्सप्रेस'मध्ये पुन्हा भाव खाऊन जाणार, अशी चिन्हं दिसत आहेत.

अभिनेता कुणाल खेमू  'मडगाव एक्सप्रेस'च्या माध्यमातून दिग्दर्शकीय पदार्पण करतोय. काहीच दिवसांपुर्वीच सिनेमाची जबरदस्त घोषणा करण्यात आली. सिनेमात द्विवेंदू, प्रतीक गांधी, अविनाश तिवारी प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय नोरा फतेही सुद्धा सिनेमात विशेष भूमिका साकारणार असल्याचं समजतंय.  'मडगाव एक्सप्रेस' सिनेमा २२ मार्च २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :उपेंद्र लिमये बॉलिवूडकुणाल खेमूनोरा फतेही